अमळनेर
सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेल्या येथील मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे टॅक्सी चालक, मालक व हातमजूरी करणाऱ्यांना शेकडो बांधवांना दिवाळी फराळ वाटप करुन त्यांची दिवाळी गोड केली.
या स्तुत्य उपक्रमासाठी स्वादिष्ट नमकीन यांचे विशेष सहकार्य लाभले.राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, स्मिताताई वाघ, शिरीष चौधरी, लायन्स क्लब व रोटरी क्लबचे आर्थिक सहकार्य लाभले.
यंदा दुष्काळाचे सावट त्यातच शासनाने महिला व जेष्ठ नागरिकांना बस भाडे दरात सवलत दिल्याने टॅक्सी चालक, मालकांचे आर्थिक कंबरडे मोडले गेले. त्यामुळे दिवाळीसारख्या सणाच्या दिवशी या बांधवांच्या घरी आनंदोत्सव साजरा व्हावा या उदात्त हेतूने मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यासाठी दात्यांनीही मंगळग्रह सेवा संस्थेच्या हाकेला सकारात्मक प्रतिसाद आर्थिक मदत केली.
यावेळी मंत्री पाटील यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. अमळनेर टॅक्सी चालक-मालकांचा समस्या लक्षात घेता अद्ययावत कार्यालय व टॅक्सी स्टॅडवर शेडसाठी निधी उपलब्ध करून दिला. शिवाय या कार्यक्रमप्रसंगी औपचारीक भूमिपूजनही केले.
माजी आमदार साहेबराव पाटील व स्मिता वाघ यांनीही मनोगते व्यक्त केली.यावेळी फार्मसी कॉलेजचे चेअरमन योगेश मुंदडा, लायन्स क्लबचे अध्यक्ष दिलीप गांधी, सचिव प्रितम मणियार, खजिनदार पंकज मुंदडा, सभासद जितेंद्र जैन, चेतन जैन, राजू नांढा, रवींद्रसिंग कालरा, प्रदिप अग्रवाल, प्रशांत सिंघवी, डॉ. रवींद्र जैन, निरज अग्रवाल, हेमंत पवार, रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रतिक जैन, सचिव देवेंद्र कोठारी, सभासद विवेक देशमुख, अभिजित भांडारकर, सुबोध पाटील, ताहा बुकवाला, टॅक्सी युनियन संघटनेचे माजी अध्यक्ष सुधाकर वामनराव पवार, मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सह सचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त डि. ए. सोनवणे, माजी नगरसेवक विनोद कदम, टॅक्सी मेन्स युनियनचे अध्यक्ष अरुण केळकर, उपाध्यक्ष राजेंद्रसिंग परदेशी, खजिनदार सुनिलदत्त रणधीर, सचिव ईश्वरलाल पाटील, सह सचिव गणेश महाजन, सदस्य ईश्वरलाल देशमुख,मेहमुदखा पठाण, प्रकाश पवार, विठ्ठल शिंपी, कैलास पाटील, नितीन पाटील तसेच महाराष्ट राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष जयंतलाल वानखेडे व पदाधिकारी व व्हॉइस आॅफ मीडियाचे पदाधिकारी उपस्थित होते.
सूत्रसंचालन मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले यांनी केले तर आभार संस्थेचे सहसचिव दिलीप बहिरम यांनी मानले.
