अमळनेर प्रतिनिधी
राज्याचे मदत व पुनर्वसन,आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री ना अनिल भाईदास पाटील हे अमळनेर येथून धरणगाव येथे जात होते. यावेळी धरणगाव रस्त्यावर म्हसले गावाजवळ गतिरोधकावर गाडी आदळून अपघात झाला होता.त्या ठिकाणी एक भगिनी रस्त्यावर पडलेली दिसून आली याक्षणी आपल्या सह सर्व ताफा थांबवून त्या भगिनीला सुरक्षित ठिकाणी बसवण्यात आले. याक्षणी तिची आस्थेने चौकशी केली आणि तातडीने तिला रुग्णवाहिकेतून अमळनेर येथील दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्याची व्यवस्था करण्यात आली.
रुग्णवाहिकेत बसविल्यानंतर मंत्री अनिल पाटील यांनी अमळनेर येथील डॉक्टरांना फोनवरून संपर्क करत त्या भगिनिला दाखल करून उपचार करण्याच्या सूचना केल्या. तसेच यासाठी त्यांना आवश्यक ती मदत करण्याचा सूचना केल्या. अशा संकटसमयी आणि ऐन भाऊबीजेच्या मुहूर्तावर एका भगिनीची सेवा करता आली याचं समाधान मिळालं असे मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले.

