अमळनेर तालुक्यात वाळू तस्करांनी केली तलाठी पथकाला मारहाण,गुन्हा दाखल


अमळनेर

तालुक्यातील महसूल पथकातील तलाठ्यांना प्लास्टिक लाठी काठीने जबर मारहाण केल्याच्या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.सदर घटना नांद्री दहिवद रस्त्यावर दहिवद गावाजवळ रविवारी दि .19 रोजी पहाटे 6 च्या सुमारास घडली.यात चालक योगेश संतोष पाटील व भूषण देवरे यांच्यासह अन्य दोन अज्ञात इसम असा एकूण चार जणांचा यामध्ये समावेश आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की,अवैध गौण खनिज चोरी रोखणेकामी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी पथक तयार केले होते. सदर पथकात तलाठी संदीप शिंदे सह योगेश पाटील मंडळ अधिकारी हेडावे भाग, प्रकाश बी महाजन तलाठी नंदगाव, मधुकर पाटील तलाठी नेमलेले होते. दि.19 रोजी सकाळी 5 वा वरील पथकातील कर्मचारी खाजगी वाहनाने पातोंडा, दहिवद ता अमळनेर शिवारात गस्त करीत असतांना सकाळी 06.00 वाजेचे सुमारास नांद्री ते दहिवद गावाकडे येणारे रस्त्याने दहिवद गावाचे जवळ एक निळ्या रंगाचे स्वराज कंपनीचे ट्रैक्टर ट्रॉलीसह नांद्री गावाकडुन दहिवद गावाकडेस येतांना दिसले तलाठी यांनी त्यास थांबवुन चेक केले असता सदर ट्रॅक्टरचे ट्रॉलीमध्ये सुमारे एक ब्रास वाळु भरलेली होती. तेव्हा तलाठी संदीप शिंदे यांनी सदर ट्रॅक्टरवरील चालक यास पथकातील कर्मचारी यांची ओळख करुन देवून त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव योगेश संतोष पाटील रा नांद्री ता अमळनेर असे सांगितले. तेव्हा तलाठ्यांनी त्यास वाळु वाहतुकीचा परवाना / पास / चलन पावती आहे काय बाबत विचारले असता त्याने वाळू वाहतुकीचा कोणताही पास,परवाना नसल्याचे सांगितले. तेव्हा तलाठ्यांनी त्यास त्याचे ताब्यातील ट्रॅक्टर अमळनेर पोलीस स्टेशन येथे कारवाई करणेकामी सोबत घेवुन चालणे बाबत सांगीतले असता, चालक योगेश संतोष पाटील रा नांद्री याने नकार देवुन शिवीगाळ करू लागला व तुम्हाला मारण्यासाठी लोक बोलवितो असे बोलून तो ट्रॅक्टर जागीच सोडुन पळुन गेला.त्यानंतर सदरचे ट्रॅक्टर व ट्रॉली हे विनानंबरचे असल्याने तलाठी संदीप शिंदे स्वता ट्रॅक्टरवर चढून त्याचा इंजीन नंबर व चेचिस नंबर घेत असतांना दोन मोटार सायकली आले त्यापैकी एक होंडा शाईन कंपनीची मो.सा.क्र एम एच 19 डी एम 0528 वर भुषण उर्फ सोनु राजेद्र देवरे रा पातोंडा व त्याचे सोबत ट्रैक्टर सोडुन पळुन गेलेला चालक योगेश पाटील हा होता व दुसरी मोटार सायकल हिरोहोड़ा कंपनीची मो.सा.क्र एम एच 21 वी 2992 हिचेवर दोन अज्ञात इसम नाव, गाव माहित नाही असे सदर ठिकाणी येवून तलाठी संदीप शिंदे व पथकातील कर्मचारी यांना शिवीगाळ करुन मारहाण करु लागले. तलाठी संदीप शिंदे यांना अज्ञात 2 व्यक्तींनी ट्रॅक्टरवरुन खाली ओढले व लाथा बुक्यांनी मारहाण करून ट्रॅक्टर समोर आडवे पाडुन याला आज जिवंत सोडायचे नाही असे म्हणुन लागलीच ट्रॅक्टर चालक योगेश पाटील याने ट्रॅक्टर वर बसून ट्रॅक्टर चालू करून ट्रॅक्टरच्या चाकाखाली दाबुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करीत असतांना सोबतचे पथकातील कर्मचारी यांनी शिंदे यांना लागलीच ट्रॅक्टरच्या चाकापासुन बाजुला ओढुन घेतले. तेव्हा भुषण राजेद्र देवरे रा पातोंडा व त्याचे सोबतचा 2 अनोळखी इसम अशांनी मोटार सायकलला असलेल्या प्लास्टीकच्या काठ्या काढुन तलाठी शिंदे व पथकातील प्रकाश महाजन तलाठी नंदगाव अशांना मारहाण करुन शिंदे यांच्या उजवे हातचे अंगठ्या शेजारील बोटाला जबर मार लागून दुखापत झाली आहे. तसेच माझे डावे मांडीवर व उजवे गुडघ्यावर काठीने मारहाण केली तसेच प्रकाश महाजन यांचे दोन्ही पायावर व डोक्यावर मारहाण करुन मुकामार लागला तेव्हा घडलेल्या घटनेबाबत पथकातील योगेश रमेश पाटील हे त्यांचे मोबाईलद्वारे व्हिडीओ चित्रीकरण करीत असतांना मारहाण करणारे नमुद चार इसम यांनी शिवीगाळ करुन जिवेठार मारण्याची धमकी देवून आम्ही करीत असलेल्या शासकीय कामात अडथळा निर्माण केला आहे. सदरचे घटनेचे चित्रीकरण तलाठी यांनी मोबाईल मध्ये संकलित आहे.त्यानंतर नमुद चारही इसमांपैकी भुषण देवरे हा तलाठ्यांना शिवीगाळ करून म्हणाला की, तुम्ही माझ्यावर गुन्हे दाखल करा मी कुणालाही घाबरत नाही अजुन माझे लोकांना बोलावुन तुम्हाला मारुन टाकतो असे म्हणत असतांना आमचे पथकातील योगेश रमेश पाटील यांनी वरिष्ठांना फोन लावुन घटनास्थळी पोलीस मदतीची मागणी केली तेव्हा पोलीस येणार असल्याचे त्यांना समजल्याने नमुद चारही इसम हे त्याचे ताब्यातील ट्रॅक्टर व मोटार सायकली जागीच सोडुन जंगलात पळुन गेले काही वेळाने तेथे पोलीस पथक आले त्यानंतर वरील नमुद मोटार सायकली व ट्रॅक्टरचे ट्रॉली वाळू सहित असे एकूण 335600 किमतीचे मुद्देमाल असे पोलीस स्टेशनला जमा केले.
याप्रकरणी तलाठी संदीप शिंदे यांनी अमळनेर पोलिसांत योगेश संतोष पाटील चालक व भूषण देवरे यांच्यासह अन्य दोन अज्ञात इसम असा एकूण चार इसमांविरुद्ध दिलेल्या फिर्यादीवरून कलम ३०७,३५३,३७९,५०४,५०६,३३२,३४,४८(७),४८(८) ,३,१५अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विकास शिरोडे हे करीत आहेत.

याबाबत गुन्हा दाखल केलेला असून पोलिसांनी लवकरात लवकर आरोपींना अटक करावी – तहसीलदार रुपेशकुमार सुराणा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *