अमळनेर
रेल्वे विभागामार्फत नव्याने सुरू करण्यात आलेली दादर-नंदुरबार(०९०४९/५०) एक्सप्रेस आता भुसावळ पासून धावणार आहे., ही गाडी भुसावळ पासून करावी यासाठी ना.अनिल भाईदास पाटील व खासदार स्मिता वाघ यांनी रेल्वे प्रशासनाकडे लेखी मागणी केली होती. ही रेल्वे गाडी नंदुरबार पर्यंत असल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार होती.ही गाडी भुसावळ पर्यंत करण्यात यावी अशी मागणी जळगांव, धरणगांव,अमळनेर येथील रेल्वे प्रवासी संघटना, स्थानक सल्लागार समिती यांनी वेळोवेळी केली होती, ह्या मागणीच्या अनुषंगाने ना.अनिल भाईदास पाटील व खा.स्मिता वाघ यांनी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता.दरम्यान खानदेशला मुंबई सोबत जोडणाऱ्या यापूर्वी दोन रेल्वे गाड्या सुरू करण्यात आल्या होत्या परंतु शुक्रवारी कुठलेही रेल्वे गाडी नसल्यामुळे प्रवाशांचे आतोनात हाल होत होते. ही रेल्वे गाडी उपलब्ध होणार असल्यामुळे प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. ही गाडी आता भुसावळ पर्यंत धावणार असल्यामुळे प्रवासी संघटना यांनी ना.अनिल भाईदास पाटील व खासदार स्मिता वाघ यांचे आभार व्यक्त केले आहे.