मंगळग्रह सेवा संस्था व व्हॉईस ऑफ मीडियाचा स्तुत्य उपक्रम
अमळनेर
कायदा व सुव्यवस्थेचे पालन करुन गणरायाला निरोप देताना विसर्जन मिरवणुकीत शांतता प्रस्थापित ठेवणाऱ्या गणेश मंडळांचा मंगळग्रह सेवा संस्था व व्हॉईस ऑफ मीडियातर्फे दगडी दरवाज्यासमोर भव्य व्यासपीठावर सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान शहराची शांतता अबाधित राहावी, यासाठी कायदा व सुव्यवस्थेचे पालन करणाऱ्या गणेश मंडळांचा सातव्या, नवव्या व अकरा अर्थात अनंत चतुर्दशीच्या दिवशी सन्मानपत्र देऊन यथोचित सन्मान केला जाईल, असे आवाहन करण्यात आले होते. आवाहनाला जवळपास सर्व मंडळांनी प्रचंड प्रतिसाद देऊन मिरवणुकांमध्ये जोश व होशचा समन्वय साधला. त्यानुसार मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, खजिनदार गिरीश कुलकर्णी, सचिव सुरेश बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, विश्वस्त अनिल अहिरराव, प्रकाश मेखा, व्हि. व्हि. कुलकर्णी, भाजपा तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, खा.शि. मंडळ उपाध्यक्षा माधुरी पाटील, काँग्रेसच्या सुलोचना वाघ, माजी जि. प. सदस्य ॲड. व्हि. आर. पाटील, खा. शि. मंडळाचे संचालक योगेश मुंदडे, विनोद अग्रवाल, माजी उपनगराध्यक्ष लालचंद सैनानी, विजय माहेश्वरी, अर्बन बँकेचे संचालक प्रविण जैन, पंकज मुंदडे, निर्मला बडगुजर, विजय पवार,
निवृत्त न्यायाधीश गुलाबराव पाटील, प्रशांत निकम, अमेय मुंदडा, दिलीप गांधी , प्रशांत सिंघवी , राजू नांढा, जितेंद्र गोहील , आशिष चौधरी , विशाल शर्मा , जी.एस. चौधरी , ए.डी.भदाने ,सुंदरपट्टीचे माजी सरपंच सुरेश पाटील, माजी नगरसेवक बाळा पवार, जितेंद्र जैन, निरज अग्रवाल, सुभाष चौधरी, ॲड. शकिल काझी, राष्ट्रवादीचे मुक्तार खाटिक, इम्रान शेख, माजी नगरसेवक नरेंद्र संदानशिव, विनोद कदम, निवृत्त प्रशासन अधिकारी भाऊसाहेब देशमुख, अनिल बेंडवाल, संतोष बिऱ्हाडे, पंकज भोई आदी मान्यवरांच्या हस्ते गणेश मंडळांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
‘या’ गणेश मंडळांचा झाला सन्मान