भाव-भक्ती भजन संध्या कार्यक्रमाने जपली भारतीय संस्कृती

भाव-भक्ती भजन संध्या कार्यक्रमाने जपली भारतीय संस्कृती

मंगळग्रह सेवा संस्था आणि व्हॉईस ऑफ मीडियाचा स्तुत्य उपक्रम

अमळनेर : 

३१ डिसेंबर म्हटले म्हणजे सर्वत्र धांगडधिंगा, पार्ट्या, मद्यप्राशन हे आलेच. मात्र या पाश्चात्य संस्कृतीला तिलांजली देत येथील मंगळग्रह सेवा संस्था आणि देशातील क्रमांक एकची पत्रकार संघटना व्हॉईस ऑफ मीडियाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भाव-भक्ती भजन संध्या कार्यक्रमाद्वारा भारतीय संस्कृतीची जपणूक झाल्याचे चित्र बघावयास मिळाले.

   एकीकडे शहरात नववर्षाच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबर रोजी रात्री अनेक जण मद्यसेवन करून डीजेच्या तालावर थिरकत जात होते.तर दुसरीकडे मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार डॉ. डिगंबर महाले यांच्या संकल्पनेने ख्यातनाम मंगळग्रह मंदिरात आयोजित भाव-भक्ती भजन संध्या शेकडो जण कार्यक्रमात तल्लीन झाले होते.

   या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्ये म्हणजे शहरातील वेगवेगळ्या म्युझिकल ग्रुपच्या कलाकारांनी एकाच छताखाली येत आपली कला सादर केली. त्यात स्वरांजली म्युझिकल ग्रुप, गुरूदेवा ऑर्केस्ट्रा, गीत गाता हू मैं म्युझिकल ग्रुप,

नवदुर्गा गायन ग्रुप, सुवर्णकला गायन ग्रुप, त्रिवेणी महिला ग्रुप, जैन बंधु ग्रुप आदींचा समावेश होता.

    स्वरांजली म्युझिकल ग्रुपचे किशोर देशपांडे, नेहा किशोर देशपांडे, मिलींद पाटील, विद्या पाटील, पूनम अग्रवाल, प्रदीप शिंगाणे, युगछाया शिंगाणे, रवींद्र माळी, देविदास बिरारी, नितीन गुरव, तसेच शरद सोनवणे, अपेक्षा पवार, सतिश कांगणे, सविता देशमुख, स्नेहा एकतारे, मनिषा गवते, सुभाष सोनवणे, प्रा. व्ही. आर. पवार, वसुंधरा लांडगे, सुयश जैन, पुष्कर जैन, अर्चना शहा, हेमंग झाबक आदींनी विविध भावगित, भक्तिगिते सादर करून उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले.

   दरम्यान लोकसभा व विधानसभा निवडणुक निर्विघ्न पार पाडल्यामुळे पोलीस निरीक्षक विकास देवरे यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

   रात्री १२ वाजता मंगळग्रह देवतेची महाआरती झाली आणि केशरयुक्त दूध प्राशनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

   यावेळी महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस तिलोत्तमा पाटील, खा. शि. मंडळाचे संचालक हरी भिका वाणी, सीए नीरज अग्रवाल व माधुरी पाटील, प्रा. अशोक पवार, अ‍ॅड. ललिता पाटील, संदीप घोरपडे, जितेंद्र जैन, रणजित शिंदे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र जाधव, प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.बी. जैन, स. सु. बोरसे यांच्यासह रोटरी क्लब, लायन्स क्लब, शहरातील विविध महिला मंडळ, व्हॉईस आॅफ मीडियाचे संजय सूर्यवंशी, जयंतलाल वानखेडे,भाऊसाहेब देशमुख, अजय भामरे, सुखदेव ठाकूर, उमाकांत ठाकूर, बापूराव ठाकरे,कमलेश वानखेडे ,संजय पाटील, किरण चव्हाण, जगदीश पाटील, पंकज पाटील आदी पदाधिकारी व शेकडो रसिक उपस्थित होते.

     यशस्वीतेसाठी मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव सुरेश बाविस्कर, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, जयश्री साबे, मंगल सेवेकरी प्रकाश मेखा, पुषंद ढाके, माजी नगरसेवक विनोद कदम, बाळा पवार, विनोद अग्रवाल, शरद कुलकर्णी, मनोहर तायडे, हेमंत गुजराथी ,रवींद्र मोरे ,जितेंद्र पाटील आदींनी परिश्रम घेतले.

   सूत्रसंचालन व्हॉईस ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष उमेश काटे व दयाराम पाटील यांनी केले तर आभार जिल्हा संघटक जयेश काटे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *