शासकीय उपसा सिंचन योजना 1 व 2 चा उद्या शुक्रवारी भूमिपूजन सोहळा

शासकीय उपसा सिंचन योजना 1 व 2 चा उद्या शुक्रवारी भूमिपूजन सोहळा

अमळनेर

 

          निम्न तापी प्रकल्प पाडळसे धरणावरील शासकीय उपसा सिंचन योजना 1 व 2 चा भव्य भूमिपूजन सोहळा शुक्रवार, दिनांक 24 जानेवारी रोजी दुपारी 4.00 वाजता श्री.चक्रधर स्वामी मंदिरा जवळ खेडी (वासरे) येथे आयोजित करण्यात आला आहे.
सदर भूमिपूजन माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते होणार असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती स्मिताताई वाघ खासदार- जळगाव लोकसभा या उपस्थित राहणार आहे.
सदर शासकीय उपसा सिंचन मतदार संघातील शेतकरी बांधवांसाठी जनसंजीवनी ठरणारी असल्याने आमदार अनिल पाटील यांचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून आठ दिवसांपूर्वी योजना 3 व 4 चे भूमिपूजन होऊन वेगाने काम सुरू झाले आहे,आता पुन्हा 1 व 2 चे भूमीपूजन झाल्यानंतर या कामाला देखील वेग येणार आहे.तरी सदर भूमीपूजन प्रसंगी सर्व शेतकरी बांधवांनी तसेच अमळनेर मतदारसंघातील महायुतीचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *