अमळनेर भाजपा तालुकाध्यक्षपदी हिरालाल पाटील यांची फेरनिवड तर शहर अध्यक्षपदी विजयसिंग राजपूत यांची निवड

अमळनेर

 भाजपचे तालुका अध्यक्ष हिरालाल पाटील यांची त्यांच्या उत्कृष्ट कामामुळे त्यांची पक्षश्रेष्ठींनी पुन्हा तालुका अध्यक्षपदी फेरनिवड केली आहे. आगामी काळात येणाऱ्या विधानसभा व लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपच्या तालुका अध्यक्ष व शहराध्यक्ष पदी तरुण चेहऱ्यांना भाजपने संधी दिली आहे.

या बाबत सविस्तर वृत्त अशी की, चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष भाजपा यांच्या आदेशाने मा.ना देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री, मा. ना. गिरीश भाऊ महाजन ग्रामविकास मंत्री, मा. विजय भाऊ चौधरी.प्रदेश महामंत्री, मा रवीजी अनासपुरे प्रदेश मुख्यालय प्रमुख,मा.आ श्रीमती स्मिताताई वाघ प्रदेश उपाध्यक्षा यांच्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज पाटील जळकेकर यांनी काल अमळनेर भाजपा तालुका अध्यक्ष म्हणून हिरालाल शांताराम पाटील दहीवद खुर्द यांची फेरनिवड केली व विजय सिंग राजपूत यांची शहर अध्यक्ष पदी निवड केली.

या निवडीचे खासदार मा उन्मेष पाटील, मा. आमदार मंगेश पाटील,पारोळा विधानसभा निवडणूक प्रमुख करण पाटील,लोकसभा निवडणूक प्रमुख डॉ राधेश्याम चौधरी, प्रदेश पदाधिकारी ऍड व्ही आर पाटील, भैरवी वाघ पलांडे, भारती सोनवणे, जिल्हा पदाधिकारी सचिन पानपाटील, भिकेश पाटील, बाळासाहेब पाटील, मीना पाटील, माजी कृ ऊ बा सभापती प्रफुल्ल बापू पवार ,शितल देशमुख,राकेश पाटील व सर्व भाजपा पदाधिकारी,लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले.

2 thoughts on “अमळनेर भाजपा तालुकाध्यक्षपदी हिरालाल पाटील यांची फेरनिवड तर शहर अध्यक्षपदी विजयसिंग राजपूत यांची निवड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *