अमळनेर
खेलो इंडीया स्पर्धेत महाराष्ट्र राज्यात दिनेश बागडे यांनी अमलनेर चा झेंडा रोवला मसल्स फॅक्टरी जिमचे ट्रेनर किशोर महाजन यांनी आनंद व्यक्त करत अभिनंदन केले. काही वर्षापूर्वी दिनेश बागडे याचा अपघात झाला होता. त्याला रेल्वे अपघातात त्याला एक पाय गमवावा लागला होता त्यावेळी दिनेश हा स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता.अशा वेळी अचानक त्याच्या समोर उभे राहिलेल्या या संकटाचा सामना त्याने अतिशय संयमाने केला निराश न होता परीस्थितीला सामोरे जाण्याचे त्याने ठरवले. संघर्ष ज्याच्या आयुष्यात तोच भविष्य घडवतो ज्या पद्धतीने अपघातातून सावरून त्याने पुन्हा स्वतः चे शारीरिक अपंगत्वावर मात करत ट्रेनिंग घेतले. मनोबल मजबूत असेल आईवडिलांचा आशीर्वाद व अमळनेर करांचे प्रेम किशोर महाजन सारखा मित्र ट्रेनर असेल तर दिनेशला कोणीही हरवू शकत नाही हे खरे ठरले आणि दिनेश आता दिल्लीत खेळणार आहे अमळनेरचा आवाज बुलंद होणार आहे… दिनेशचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपण आशीर्वाद रुपी सदिच्छा देऊ या…. मसल्स फॅक्टरी जिमला आशीर्वाद रुपी सदिच्छा देणारे मा.डाॅ योगेश महाजन साहेब अध्यक्ष परीश्रम दिव्यांग मुलामुलींची निवासी शाळा पारोळा, महेंद्र भाऊ महाजन ( कुबेर ग्रूप ) व डाॅक्टर दिनेश महाजन (मोरया हॉस्पिटल), विक्रांत पाटील व स्वप्निल पाटील सर , दर्शना ताई पवार माईंड पार्लर यासह अमलनेर मधील नेहमीच पाठराखण करणारे पत्रकार व समाजातील मान्यवर यांचेही आभार किशोर भाऊ महाजन यांनी मानले.