अमळनेर तहसील कार्यालयामार्फत जिल्हास्तरीय राष्ट्रीय ग्राहक दिन संपन्न

अमळनेर तालुका प्रतिनिधी

राष्ट्रीय ग्राहक दिनाला खूप महत्त्व असून दि.24 डिसेंबर १९८६ मध्ये ग्राहक संरक्षण कायदा अंमलात आला. या प्रमाणे दरवर्षी 24 डिसेंबर हा दिवस भारतात विशिष्ट संकल्पनेसह साजरा केला जातो. यावर्षीची संकल्पना consumer protection in the era of e-commerce and digital trade (ई-कॉमर्स आणि डिजिटल व्यापाराच्या युगात ग्राहक संरक्षण) ही आहे. या संकल्पनेवर ग्राहकांचे प्रबोधन व्हावे या दृष्टिकोनातून सुधारित ग्राहक संरक्षण कायदा 2019 यावर प्रबोधन पर कार्यक्रम आयोजित करण्याच्या केंद्र शासनाच्या सूचना आहेत. त्यानुसार अमळनेर तहसील कार्यालयातील पुरवठा विभाग व अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर व ग्राहक कल्याण फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा जिल्हास्तरीय कार्यक्रम आय.एम.ए हॉल जी एस हायस्कूल अमळनेर येथे सकाळी 11 वा घेण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सेवानिवृत्त तहसीलदार आर.पी.उपासने,कार्यक्रमाचे मान्यवर मा.डॉ अनिल देशमुख जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय ग्राहक पंचायत जळगाव तथा सदस्य ग्राहक संरक्षण परिषद जळगाव,मा.हेमंतदादा भांडारकर जिल्हाध्यक्ष ग्राहक कल्याण फाउंडेशन जळगाव,तसेच प्रमुख पाहुणे सौ.स्मिता चंद्रात्रे तालुका अध्यक्ष ,ऍड सौ.भारती अग्रवाल महिला प्रमुख मध्य महाराष्ट्र व सदस्य ग्राहक संरक्षण परिषद जळगाव ,सौ.ज्योती भावसार तालुका संघटक ,मकसुद भाई बोहरी माजी ग्राहक संरक्षण परिषद सदस्य ,नरेंद्र पाटील सदस्य ग्राहक संरक्षण परिषद जळगाव, वनश्री अमृतकार आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमाच्या सुरवातीला परम पूज्य साने गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त व श्रीमंत प्रताप शेठजी यांच्या पुण्यतिथी निमित्त मान्यवरांनी प्रतिमा पुजन व दीप प्रज्वलन करून ग्राहक गीत गात कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रम स्थळी “जागो ग्राहक जागो” व ग्राहकांचे सात हक्क असलेली आकर्षक रांगोळी काढून ग्राहकांचे हित साधण्यासाठी रांगोळी कलाकार नितीन भदाणे यांनी काढलेली रांगोळी कार्यक्रमावेळी लक्षवेधी ठरली.

डॉ अनिल देशमुख यांनी consumer protection in the era of e-commerce and digital trade (ई-कॉमर्स आणि डिजिटल व्यापाराच्या युगात ग्राहक संरक्षण) या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. ग्राहक संघटनेच्या ऍड सौ भारती अग्रवाल,हेमंतदादा भांडारकर,ज्योती भावसार यांनी ग्राहक हक्काबाबत मार्गदर्शन केले.यावेळी ग्राहकांच्या समस्यांचे निराकरण करण्यात आले.

यावेळी प्रधानमंत्री जन आरोग्य कार्ड(आयुष्मान कार्ड) कसे काढावे याबद्दल शिधा वाटप दुकानदार आणि उपस्थित ग्राहक यांना तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारी कर्मचारी यांनी मार्गदर्शन व प्रात्यक्षिक सादर केले.ग्राहकांना घरगुती गॅस वापराबद्दल घ्यायची काळजी अपघात कसा टाळावा याचे प्रात्यक्षिक गॅस वितरक यांनी केले.

यावेळी कार्यक्रमास मकसुद बोहरी जिल्हा संघटक व तालुका निरीक्षक अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर, जयंतलाल वानखेडे, प्रा. रवींद्र माळी तालुकाध्यक्ष ग्राहक कल्याण फाउंडेशन अमळनेर,उमेश धनराळे, वनश्री अमृतकर, महेंद्र बोरसे, प्रवीण गोसावी,सुरेश पाटील,ॲड.कुंदन साळुंखे,ॲड.विवेक लाठी,डॉ.रामराव पाटील,दीपक भोई,प्रा.श्री.सुभाष माळी, पुरवठा निरीक्षण अधिकारी संतोष बावणे, पुरवठा निरीक्षक एन.एम.जाधव,अव्वल कारकून नयना महाजन लिपिक चित्रलेखा सामुद्रे,ज्योती भावसार तसेच तालुक्यातील ग्राहक आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुरवठा निरीक्षण अधिकारी संतोष बावणे यांनी केले तर सूत्रसंचालन पुरवठा अव्वल कारकून नयना महाजन व आभार प्रदर्शन गोदाम व्यवस्थापक श्रीमती घोंगळे मॅडम यांनी केले.सदर कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता पुरवठा कार्यालयातील सर्व कर्मचारी व ग्राहक संघटनेतील पदाधिकारी यांचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीत गायनाने झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *