जी एस हायस्कूल येथे श्रीमंत प्रताप शेठजी व सानेगुरुजी यांना अभिवादन

*अमळनेर (प्रतिनिधी):-

येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित जी.एस.हायस्कूल येथे पूज्य सानेगुरुजी यांची जयंती तसेच श्रीमंत प्रताप शेठजी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.यावेळी विद्यार्थ्यांनी साने गुरुजी व प्रताप शेठजी यांच्या कार्याविषयी आपल्या भाषणातून माहिती दिली.उपशिक्षक के.डी.साळुंखे यांनी मनोगतातून साने गुरुजी व प्रताप शेठजी यांच्या कार्याला उजाळा दिला.

यावेळी ग्राहक दिन देखील साजरा करण्यात आला, तसेच ग्राहक दिनानिमित्त ग्राहकांचे संरक्षण,हक्क,ग्राहकांची होणारी फसवणूक,ऑनलाइन फसवणूक याबाबतीत उपशिक्षिका टी.एम.शेख यांनी सविस्तर व उपयुक्त माहिती विद्यार्थ्यांना दिली.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक बी. एस.पाटील, उपमुख्याध्यापक सी.एस.पाटील,पर्यवेक्षक एस.बी. निकम, शिक्षक प्रतिनिधी ए.डी. भदाणे,जेष्ठ शिक्षक एस.आर. शिंगाणे,के.पी.पाटील,मुख्य लिपिक शाम पवार तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.सूत्रसंचालन विद्यार्थी संघ प्रमुख सचिन अहिरे यांनी केले.आभार आर.जे.पाटील यांनी मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *