सख्ख्या बहिणीमुळे दुभंगलेला संसारमहिला अन्याय विरोधी समितीने सांधला!


अमळनेर-

सख्ख्या बहिणीशी पतीचे सूत जुळले व त्याने आशाला(नाव बदलले आहे) तसेच 7 वर्षीय कन्येला वाऱ्यावर सोडले.. संसाराची वाताहत बहिणीनेच केल्याने अमळनेर येथील महिला अन्याय विरोधी समितीचे धनंजय सोनार यांचे कडे आशाबाईने धाव घेतली असता आशाबाईचा गेली दीड वर्ष दुभंगलेला संसार सुरळीत करण्यात समितीच्या कार्यकर्त्यांना यश आले आहे.
सालीसोबत लग्न न करता धुळे येथे राजरोस संसार थाटणारा कैलास(बदलेलेले नाव) व सालीची कानउघाडणी करण्यात आली, कायद्याचा धाक तसेच बहिणीच्या संसाराची झालेली वाताहत, दोन्ही परिवाराची होत असलेली बदनामी, दोघांच्या नोकरीवर बालंट येऊ शकते या बाबत समुपदेशन करण्यात आले.
अखेर पंचासमक्ष माफीनामा व चांगल्या वर्तणुकीचे लेखी घेतल्यानंतर आशा नांदावयास गेली, तर बहिणीने पायावर लोळण घेत बहिणीच्या संसारात कधी व्यत्यय आणणार नाही म्हणत गाशा गुंढाळला.
या कामी अमळनेर महिला अन्याय विरोधी समितीचे धनंजय सोनार, निशा विसपुते, मंगलाबाई, वैशाली शिंदे, राजकुमार कोराणी, विनोद राऊळ, अनिल चौधरी, बाळकृष्ण शिंदे आदींनी परिश्रम घेतले.
अमळनेर महिला अन्याय विरोधी समितीने या पूर्वी देखील अशा अनेक बाधित महिलांना न्याय मिळवून देण्याचे केलेले काम उल्लेखनीय आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *