जी.एस.हायस्कूल विद्यार्थ्यांना मिळाले योगाचे धडे
अमळनेर(प्रतिनिधी):-

येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित जी.एस.हायस्कूल येथे २१ जून रोजी योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी क्रीडा शिक्षक एस.पी.वाघ,के.आर.बाविस्कर यांनी विद्यार्थ्यांना योगाचे धडे दिले.यावेळी विद्यार्थ्यांनी योगाची विविध प्रात्यक्षिके केली.
यावेळी मुख्याध्यापक बी.एस.पाटील,उपमुख्याध्यापक ए.डी. भदाणे,पर्यवेक्षक एस.आर.शिंगाने, सी.एस.सोनजे, जेष्ठ शिक्षक के.पी.पाटील, पी.एस.काटकर ,वाघ सर,राहुल पाटील सर,कैलास बाविस्कर सर तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
द्रौ.रा.कन्याशाळेत योग दिन साजरा
अमळनेर( २१ जून )

द्रौ.रा.कन्याशाळेत आंतरराष्ट्रीय योग दिवस विद्यार्थी व शिक्षकांनी योग प्रात्यक्षिक करून साजरा केला. द्रौ.रा.कन्याशाळेत मुख्याध्यापिका एस.एस. सुर्यवंशी,जेष्ठ शिक्षिका बी. एस.पाटील,क्रिडा शिक्षिका आर.एस सोनवणे, एल. व्ही. घ्यार यांनी विद्यार्थ्यांसोबत योगासन केले. डॉ.मृणाल पाटील यांनी आयुष्यात योगाचे महत्त्व व योगक्रियांच्या माध्यमातून होणारा विकास याबद्दलची माहिती दिली व योगासन प्रात्यक्षिक करून दाखविले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या सर्व शिक्षक- शिक्षिका यांनी सहकार्य केले.