अमळनेरात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य नोंदणी अभियान
अमळनेर-
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जळगाव जिल्हा सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ आज दि. ७ फेब्रुवारी २०२५ रोजी मा.मदत व पुनर्वसन मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते अमळनेर येथे होणार आहे.
तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, पक्षाचे तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, कार्याध्यक्ष, विधानसभा क्षेत्र प्रमुख, सर्व सेलचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व पदाधिकारी यांनी जळगाव जिल्हा सदस्य नोंदणी अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.सदर शुभारंभ दिनांक ७ फेब्रुवारी २०२५ रोजी संध्याकाळी ५ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय अमळनेर येथे होणार आहे.